8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

भारत जोडो यात्रेचा वर्धापन दिन पदयात्रेने संपन्न

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार लहू कानडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान मांजरी (ता. राहुरी) येथे पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी सहभाग घेत पदयात्रेस प्रतिसाद दिला.

गावातील ग्रामपंचायतीपासून पदयात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर चंद्रेश्वर मंदिरात तिची सांगता झाली. त्यानंतर झालेल्या सभेत आ. कानडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या जुमलेबाजीवर सडकून टिका केली. यावेळी त्यांनी देशाच्या कर्जसंबंधीचा कॅगचा अहवाल,  महागाई, बेरोजगारी, काळा  पैसा, मणिपूर व हरियाणातील घटना, धनगर तसेच मराठा आरक्षण यावर भाष्य करत केंद्र व राज्य सरकारचे वाभाडे काढले.

सरकारची ही सारी पावले हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असून मोदी व अमित शहा ही दोघेच देश चालवीत आहेत. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाही, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  लव जिहादचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यातून समाजात तेढ निर्माण करणे, त्यांचे धृविकरण करून समाजात भांडणे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या घटनांनी छोटे छोटे समाज घाबरून गेले हे ध्यानात घेऊन राहुल गांधी यांनी नफरत के बाजारोमे मोहब्बत की दुकान हे ब्रीद वाक्य घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली. ते या सरकारला जड गेले. संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांची खासदारकी रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले. परंतु त्यावरही राहुल गांधी यांनी मात केली, असे आ. कानडे म्हणाले.

यावेळी आ. कानडे यांनी मांजरी गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच गावातील समस्या जाणून घेत यावेळी आ. कानडे यांनी मांजरी गावात केलेल्या विकास कामांची माहिती दिली तसेच गावातील समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी गरीब व वंचित घटकातील नागरिकांच्या वस्तीत जाऊन त्यांच्याशी संवाद करत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. तेथील रस्ते, गटारीच्या समस्या तातडीने दूर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.

यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रखमाजी जाधव, कॉंग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, नानासाहेब रेवाळे, अनिल बिडे, कोंडीराम विटनोर, संदीप विटनोर, दत्तात्रय विटनोर, अन्नासाहेब विटनोर, गोरख विटनोर, किशोर बाचकर, भाऊसाहेब विटनोर, चांगदेव घोलप, जालिंदर आंबडकर, प्रवीण विटनोर, भानुदास चोपडे, कृष्णाजी विटनोर, कैलास विटनोर, काशीनाथ भिसे, अशोक विटनोर, भैयासाहेब विटनोर, गोरक्षनाथ घोलप, अमोल विटनोर, सर्जेराव विटनोर, धोंडिभाऊ बाचकर, दत्तात्रय विटनोर, पोपट बाचकर, राजेंद्र विटनोर, पिराजी गायकवाड, प्रकाश जोशी, अर्जुन सैदरे, भाऊसाहेब विटनोर, अशोक कोळेकर, भाऊसाहेब पोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मीही सासरी आलो आहे जनसंवाद यात्रेनिमित्त सुरू असलेल्या सभेप्रसंगी चंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या चेतन शेडगे व त्याची पत्नी निकिता या नव वधू-वरांशी संवाद साधताना आ. कानडे यांनी वधूला माहेर कुठले, असे विचारले असता तिने नेवासे असे सांगितले. त्यावर मीही नेवासे तालुक्यातील असुन इकडे सासरी आलो आहे. परंतु आता या तालुक्याचाच झालो आहे, असे आ. कानडे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!