25 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

१७ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा ग्रामीण संघाचे नेतृत्व श्रीरामपूरकडे, संघाच्या कर्णधारपदी आदमने तर प्रशिक्षक म्हणून गायधने

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-  महाराष्ट्र रोलबॉल संघटना व अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने दि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल श्रीरामपूर येथे १७ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक ९ व १० डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा रोलबॉल संघटनेचे सचिव श्री प्रदीप पाटोळे यांनी दिली.या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा ग्रामीण संघाची निवड करण्यात आली असून श्रीरामपूरचा धर्मेश आदमाने याची संघाच्या कर्णधारपदी तर श्री नितीन गायधने यांची संघ प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या संघामध्ये श्रीरामपूरचे ९ खेळाडू खेळणार आहेत.निवड झालेल्या संघाचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,जन्मजय टेकावडे, प्राचार्य डॉ योगेश पुंड,श्री हेमंत सोळंकी,श्री विठ्ठलराव दांगट तसेच सर्व शिक्षक-शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.निवड झालेला संघ पुढील प्रमाणे धर्मेश आदमाने (कर्णधार),कबीर चौदंते (उप कर्णधार), साई फरगडे,सार्थक सोलंकी,प्रथमेश जैत, आर्यन वायाल, प्रथमेश दहातोंडे, विराज पटारे व साई गाडे,श्री नितीन गायधने (प्रशिक्षक) तर प्रदीप पाटोळे (संघ व्यवस्थापक).

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!