श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) : – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील संविधान ग्रुपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. टाकळीभान येथील संविधान ग्रुप मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. संविधान ग्रुप हा गावातील सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतो. या ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या भारत राष्ट्र समिती ह्या पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे बी.आर.एस ग्रुपची टाकळीभान मधील ताकद वाढली आहे. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब रणनवरे, सुंदर रणनवरे, शामराव खरात, मधुकर रणनवरे, जॉन रणनवरे, अनिता तडके, बाळासाहेब बोडखे, शंकर रणनवरे, भरत आसरमोल, सतीश रणनवरे, अनिल रणनवरे, संदीप शिनगारे यांच्यासह संविधान ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांचा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रवेश सोहळ्यासाठी कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक मयुर पटारे, ‘अशोक’ चे माजी व्हा.चेअरमन दत्तात्रय नाईक, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, सुनील बोडखे, मल्हार रणनवरे, संजय रणनवरे, ग्रा. स. भाऊसाहेब पटारे आदी उपस्थित होते.