श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नाना गलांडेला त्वरित अटक करून या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबीयांसमवेत रिपाई च्या वतीने ११ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण श्रीरामपूर हरेगाव प्रकरणातील प्रमुख आरोपी नाना गलांडेला त्वरित अटक करून त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
तो खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या केस मध्ये विशेष सरकारी वकिलाचे नेमणूक करण्यात यावी सावकारकीच्या धंद्यातून अवैद्य मार्गाने लुबाडलेल्या लोकांच्या शेतजमिनी त्वरित परत करण्यात याव्यात या मागणीसाठी हरेगाव प्रकरणातील पीडित कुटुंबीयांसमवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर पासून सकाळी 11 ते 5 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रेल्वे स्टेशन श्रीरामपूर या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिली आहे काल श्रीरामपूर विभागाचे डी वाय एस पी डॉ. बसवराज शिवपुजे यांना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मगर ता संघटक संजय बोरगे उपाध्यक्ष मोजेस चक्रनारायण यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 25 ऑगस्ट रोजी हरेगाव या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली कबूतर चोरल्याच्या संशयावरून चार मुलांना अर्ध नग्न करून झाडाला उलट टांगून अमानुषपणे वायर रोपने जबर मारहाण करून त्यांच्या अंगावर लघवी करून बुटावर थुंकून ती थुंकी त्या मुलांना चाटायला लावली असे नीच कृत्य करणाऱ्या सात आरोपी पैकी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.
परंतु घटनेतील मुख्य सूत्रधार नाना गलांडे अजूनही मोकाट फिरतोय त्याला अद्याप अटक झालेली नाही त्याला अटक झाली नाही तर तो फिर्यादीवर साम-दाम-दंड-वापरून दबाव आणू शकतो म्हणून नाना गलांडे ला त्वरितअटक करून त्याची हरेगावला असलेली हुकूमशाही मोडीत काढून त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी तो खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या केस मध्ये विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी सावकारकीच्या धंद्यातून बळकावलेल्या लोकांच्या शेत जमीन त्वरित परत करण्यात याव्यात तशे आदेश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले अनुसूचित जाती आयोग सुभाष पारधी यांनी एस पी राकेश ओला यांना व्ही आय पी गेस्ट हाऊस 1 सप्टेंबर रोजी आदेश दिले आहे.
असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात रिपाई नेते राजाभाऊ कापसे भिमराज बागुल महिलाआघाडीच्या रमाताई धीवर राजू नाना गायकवाड राजेंद्र मगर संजय बोरगे मोजेस चक्रनारायण प्रदीप कदम सुनील शिरसाट विजय पवार विशाल सुरडकरआबासाहेब रणनवरे हितेश पवार दिलीप त्रिभुवन सुनील शिनगारे नाना खरात अर्जुन शेजवळ . मिलिंद धीवर आदींची नावे आहेत