spot_img
spot_img

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय यांच्या वतीने दुर्गापुर येथे आरोग्य जनजागृती मार्गदर्शन शिबिर  पोषण आहारसह आरोग्यदायी प्रथम उपचार किटचे मोफत वितरण

लोणी दि.९( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटिल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना वतीने दुर्गापुर तालुका राहाता येथे प्रथम उपचार साहित्य वाटप आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन मेरी माटी मेरा देश या अतंर्गत एक दिवशीय शिबिर राबविण्यात आले. 

प्रवरा ग्रामिण औषधनिर्माणशास्र महाविद्यालय, लोणी च्या राष्ट्रीय सेवा योजना यांनी जिल्हा परिषद शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालय दुर्गापुर येथे पालन पोषण आहार याविषयी मार्गदर्शन दिले. तसेच शाळेतील मुलांसाठी प्रथम उपचार साहित्य वाटप करण्यात आले. दुर्गापुर गावातील नागरिकांना जागतिक प्रथम उपचार साहित्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना च्या स्वयंसेवकानी प्रथमुपचार साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच दुर्गापुर गावाच्या शाळेत स्वच्छता मोहिम, व वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते, शाळेतील शिक्षकवर्ग, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. मयूर भोसले, डॉ. सोमेश्वर मनकर, प्रा. ज्ञानेश्वर विखे, प्रा. शुभम म्हस्के व राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवरेच्या शैक्षणिक संकुलातून गुणवत्तापुर्ण शिक्षणांसोबतचं देशाचे पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अभियान सुरु आहे यामध्ये ही संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मामार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरु असल्याने गाव पातळीवर लोकसहभागही विद्यार्थ्याना मिळत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!