8.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

दिवाणी न्यायालय इमारतीच्या कामास प्रारंभ होत असल्याचे मोठे समाधान :- आ.आशुतोष काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक शासकीय इमारती माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात उभ्या केल्या असून त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा देखील समावेश असून त्यांचा वारसा पुढे चालवितांना दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी देखील २८.२१ कोटी निधी मिळविण्यात मला यश मिळाले. या निधीतून दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीच्या कामास प्रारंभ होत असल्याचे मोठे समाधान मिळाले असल्याची प्रतिक्रिया देत या शुभारंभ कार्यक्रमास आ. आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने विजयश्री प्राप्त केल्यानंतर बार असोसिएशनच्या सदस्यांनी सत्कार करून दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मोडकळीस आल्यामुळे न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडचणी येत असल्याचे सांगत न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाची इमारत मुदतबाह्य झाल्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला असतांना देखील या ठिकाणी न्यायालयीन कामकाज करतांना येणाऱ्या अडचणींची जाणीव झाली होती. त्याच वेळी दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी निधी देईल असा शब्द बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी दिवाणी न्यायालय इमारत मुख्य अजेंड्यावर घेवून या इमारतीसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे या दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी २८.२१ कोटी निधी मिळविण्यात मला यश मिळाले. रविवार (दि.१०) पासून न्यायालयाच्या इमारतीच्या कामास प्रारंभ होत आहे याचे आत्मिक समाधान मिळत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

आ.आशुतोष काळेंकडून बार असोसिएशनच्या मागणीला न्याय ———

दिवाणी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये न्यायदानाचे काम करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याबाबत बार असोसिएशनच्या सदस्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे ईमारतीसाठी निधीची मागणी केली होती. आम्हाला कामकाज करतांना येणाऱ्या अडचणी व आमच्या मागणीची आ.आशुतोष काळे यांनी गांभीर्याने दखल घेवून दिवाणी न्यायालय (‘क’-स्तर व ‘ब’ स्तर) इमारतीसाठी २८.२१ कोटी निधी देवून आमच्या मागणीला न्याय दिल्यामुळे इमारतीच्या कामास प्रारंभ होत असून बार असोसिएशनच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचे जाहीर आभार.- ॲड .शंतनू धोर्डे (बार असोसिएशन सदस्य).

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!