14.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-जिल्हा क्रीडा संचालनालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा गौतम पब्लिक स्कूलच्या प्रशस्त हॉकी मैदानावर दिनांक ८ व ९ सप्टेंबर दरम्यान पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य नुर शेख यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या दोन्ही १५ व १७ वर्षाखालील दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. दोन्ही विजेते संघ विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेची प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

सदर स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून मुला मुलींच्या एकूण १५ संघांनी सहभाग घेतला.१५ वर्षे वयोगटातील झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कुलच्या संघाने पारंपारिक प्रतिद्वंदी मुळा पब्लिक स्कुल, सोनई संघाचा ५-० गोलफरकाने पराभव केला. १७ वर्षे वयोगटातील चुरशीच्या झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कुल संघाने मुळा पब्लिक स्कुलचा २-० गोलफरकाने पराभव केला. १७ वर्षे वयोगटातील झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई, कोकमठाण संघाने प्रवरा कन्या स्कूल, प्रवरानगर संघाचा १-० असा पराभव केला.संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य यांनी गौतम पब्लिक स्कूलच्या विजयी संघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेच्या यशस्वी करण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, व्हॉलीबॉल प्रशिक्षक इसाक सय्यद यांनी मेहनत घेतली. अकबर खान व रिझवान शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!