कोल्हार दि.१० (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरा)सहकारी साखर कारखाना सन २०२२-२०२३ च्या गळीत हंगामातील ऊस दर रुपये २७००/-जाहीर तसेच उर्वरित रक्कम रूपये ३५६/-येत्या सप्टेंबर पर्यंत सभासदांच्या खात्यावर जमा करण्याच्या अध्यादेश जारी केल्याबद्दल त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरा परिसराला वरदान ठरलेल्या शिर्डी या ठिकाणी औद्योगिक प्रकल्पाला मंजुरी मिळवल्याबद्दल कोल्हार भगवतीपुर मधील तमाम शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. श्री.राधाकृष्णजी विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील व प्रवरा परिसरातील शेतकऱ्यां मध्ये समाधान व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे पा., कोल्हारभगवतीपुर देवालय ट्रस्ट अध्यक्ष श्री.सयाजीराव खर्डे पा., राहता तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्री.ऋषिकेश खांदे पा., प्रवरा कारखान्याचे संचालक श्री.दत्तात्रय खर्डे पाटील, प्रवरा कारखान्याचे संचालक व ग्रा.पं कोल्हार बुद्रुकचे मा. उपसरपंच श्री.स्वप्निलराव निबे पा.,संचालक श्री.धनंजय दळे पा., भगवतीपुर ग्रा.पं चे मा.उपसरपंच श्रीकांत खर्डे पा., महाराष्ट्र राज्य गोल्ड व्हॅल्यूअर्स फेडरेशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत बेद्रे, देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजीराजे देवकर पा., प्रवरा सहकारी बँकेचे संचालक श्री.सुधीर आहेर पा., संचालक श्री.राजेंद्र राऊत पा. आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
{पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पा.(प्रवरा)सहकारी साखर कारखाना सन २०२२-२३ च्या गळीत हंगामातील ऊस दर २७००/- जाहीर केल्याबद्दल महसूलमंत्री मा.ना.श्री. राधाकृष्ण विखे पा.,खा.डॉ. सुजयदादा विखे पा.,मा.सौ शालिनीताई विखे पा.तसेच कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे सर्व ऊस उत्पादक सभासदांच्या वतीने जाहीर आभार}- राहाता तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्री.ऋषिकेश खांदे पा.}




