spot_img
spot_img

बेट भागाच्या विकासात आ.आशुतोष काळेंचे मोठे योगदान -सचिन परदेसी

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोपरगाव शहराच्या विकासासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी देवून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. यामध्ये कोपरगाव शहराचा बेट भाग देखील मागे नसून बेट भागात झालेल्या विकासात आ.आशुतोष काळे यांचे मोठे योगदान असल्याचे शुक्लेश्वर मंदिर प्रमुख सचिन परदेसी यांनी सांगितले आहे.

ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव मतदार संघातील देशात एकमेव असलेले शुक्लेश्वर देवस्थान कोपरगाव शहरातील बेट भागात आहे.त्यामुळे वर्षभर याठिकाणी भाविकांची मांदियाळी असते. भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करून भाविकांना अपेक्षित असणाऱ्या शुक्लेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून शुक्लेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २ कोटी निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

आ.आशुतोष काळे यांनी बेट मोहनीराज भागाच्या स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे. तसेच बेट भागाच्या रस्त्यांसाठी ४० लाख निधी दिला असून भूमिगत गटारीसाठी देखील निधी दिला असून ती कामे देखील पूर्ण होत आली आहे. सुशोभीकरणासाठी दिलेल्या निधीतून श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. कोपरगाव शहरात सुरु असलेल्या १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. मागील अनेक वर्षापासून बेट परिसरात जुन्या पाईपलाईनमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्यामुळे नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नव्हता. परंतु बेट भागात सर्वत्र नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना पूर्ण क्षमतेने नियमित पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते देखील दुरुस्त केले जाणार असून बेट भागाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी देवून बेट भागाच्या विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे सचिन परदेसी यांनी म्हटले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!