38.2 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

मतदार नोंदणीसह मतदान करुन लोकशाही भक्कम करावी -भारत खरात अभियांञिकी महाविद्यालयात महसूल सप्ताहनिमित्त युवासंवाद कार्यक्रम

लोणी दि.४ ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-महसूलचे विविध दाखले काढणे आता ऑनलाईनव्दारे सुलभ झाले आहे.लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वानी मतदार नोंदणीसह मतदान करुन लोकशाही भक्कम करावी युवा पिढी देशाचे भविष्य आहे युवकांनी शासकिय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राहात्याचे पुरवठा अधिकारी भारत खरात यांनी केले.
     

शासनाच्या वतीने महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात होत आहे. त्या निमित्ताने प्रवरा ग्रामीण अभियांञिकी महाविद्यालयात राहता तहसील कार्यालया तर्फे ‘युवासंवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाविद्यालयातील युवतींना मतदान नोंदणी महसूल विभागाच्या विविध योजना तसेच विविध कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया जसे उत्त्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, अधिवास दाखला, विविध दाखल्यांची माहिती भारत खरात यांनी दिली.
 या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने, हसनापूरचे तलाठी भाऊसाहेब कानडे,सत्यवाण मेहेरे,बालाजी भोसले, प्रा. हमीद अन्सारी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!