वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा):- नेत्रदान पंधरवडा हा दिनांक २५ ऑगस्ट ८ सप्टेबर पर्यंत साजरा करण्यात येतो.त्या अनुषंगाने उप जिल्हा रुग्णालयातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली.जसे कि उप जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला रुग्णांना ना माहिती देऊन नेत्रदान कोणी कसे कोठे करावे हि सर्वस्वी जबाबदारी नातेवाईकांची असते कारण नेत्रदाता हा मृत असतो त्यामुळे नेत्रदान करण्याचा निर्णय हा नातेवाईकांचा असतो त्याशिवाय नेत्रदान प्रक्रिया सुरू करता येत नाही.
नेत्रदानाचा फार्म भरला नसला तरी ही नेत्रदान करता येते मोतिबिंदू ऑपरेशन झाले असले तरी ही नेत्रदान करता येते बर्याच वेळा रुग्ण कोणत्याही आजारी असला तेव्हा नेत्रदान करता येते कि नाही हा मोठा प्रश्न पडतो.काही आजार वगळता जसं की एच. आय. व्ही. ग्रस्त कॅन्सर ग्रस्त क्षयरोगाचे रुग्णांना नेत्रदान करता येत नाही. १८/८० वयोगटातील कोणत्याही व्यक्ती ला नेत्रदान करता येते जिल्हा सामान्य रुग्णालयात औरंगाबाद (नेत्रपेढी) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद( नैत्रपेढी) येथे सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते मृत व्यक्ती च्या डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात डोळ्याचा पापुद्रा खराब होत नाही म्हणून नातेवाईक यांनी काळजी घ्यावी अशी माहिती डॉ,जी.पी.टारपे वैयक्तिक अधिक्षक डॉ.संजय साळवे नेत्र नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी रुग्णांना माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.टारपे सर होते तर आभार श्री.किसन चौधरी यांनी मानले.



