लोणी दि.११ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय राजुरी येथे राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था रवीनगर , नागपूर आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा मानवाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या प्रमुख विषयांतर्गत भरड धान्य पौष्टीक आहार , आधुनिक प्रगत तंत्रज्ञान , विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर पार पडली. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या विद्यार्थ्यींनींच्या संघाने पटकवला प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पातळीवर निवड झाली आहे.
स्पर्धेच्या उद्याटन प्रसंगी श्री यशवंतराव चव्हाण माध्य.व कनिष्ठ महाविद्यालय राजुरीचे प्राचार्य सुरेश विखे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ लिलावती सरोदे,पंचायत समिती शिक्षण विभागाचे दिलीप दहिफळे , सुनील लोमटे ,संस्था शिक्षण समन्वय श्री नंदकुमार दळे, राहाता तालुका विज्ञान संघटना अध्यक्ष अनिल लोंखडे, , गणित संघटना अध्यक्षा सौ.वैशाली रोकडे ,सुनील आढाव, रामदास ब्राम्हणे यांची उपस्थिती होती
सौ सरोदे मॅडम यांनी मार्गदर्शन करतांना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून मानवाने प्रगती केली ती सुखावह होत असताना समाजिकता पण जपली पाहीजे, विज्ञानाचा सकारात्मक वापर केला पाहीजे ते सर्व प्रयत्न प्रवरा संस्था करीत आहे त्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले, श्री सुनील लोमटे यांनी सर्व सहभागी संघ व शिक्षकांचे पंचायत समितीचे वतीने स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री अनिल लोखंडे यांनी करतांना स्पर्धेचे नियम अटी सांगितल्या. या नाट्य स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते.त्यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या कु सिद्धी पवने, कु अक्षरा धावणे ,समीक्षा कुमकर सह एकूण आठ विद्यार्थ्यीनींच्या गटाने उत्कृष्टपणे भरड धान्य पौष्टिक आहार, महत्व व अंधश्रद्धाळू पणा किती घातक ठरू शकतो हे पटवून देत वास्तविक चित्र समोर आणले, सांघिक कामगिरी चांगली झाली त्यामुळे त्यांच्या संघाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी फक्त एकच संघ निवडला जाणार होता , त्यासाठी ही निवड झाली, यासाठी त्यांच्या मार्गदर्शक व नाटिकेच्या निर्मात्या ,लेखिका सोनाली मेढे , पल्लवी पवार , प्रवरा कन्या मंदीर विद्यालयाच्या प्राचार्या सौ भारती कुमकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर द्वितीय क्रमांक श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा ,तृतीय क्रमांक अँग्लो उर्दू सुलताना हायस्कुल कोल्हार ,उत्तेजनार्थ सोमैया हायस्कुल लक्ष्मीवाडी व प्रवरा माध्य.विद्यालय ममदापूर यांचा आला.



