श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- प्रदुषणामुळे तापमानवाढीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नैसर्गिक संकटाची मालिका सुरु आहे. यावर मात करून निसर्गाची केलेली हानी भरुन काढणे आवश्यक आहे. त्यासाठी मानवनिर्मित वनसंपत्ती वाढली पाहिजे आणि गावोगावी वृक्षरोपणाचा उपक्रम राबविला पाहिजे, असे आवाहन अशोक कारखान्याच्या संचालक सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील भामाठाण येथील अडबंगनाथ मंदिर तसेच माळवाडगाव येथील देवी मंदिर परिसरात अशोक इंग्लिश स्कूलच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान पार पडले. याप्रसंगी सौ.मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक कारखान्याचे संचालक बाबासाहेब आदिक शिवाजी मुठे बाबासाहेब हुरुळे, बबनराव आसने, किशोर बनसोडे, मधुकर बनसोडे, शरद जासूद, भाऊसाहेब आसने, राजेन्द्र मुठे, भाऊसाहेब बनसोडे, जालिंदर मुठे, गणेश गोसावी, किशोर साठे आदी उपस्थित होते.