राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरीच्या डॉ. बा.बा. तनपुरे कारखान्या राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- वर अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज थकबाकीमुळे जमीची कारवाई केली असून बँकेकडून कारखाना पंधरा वर्षांवर भाडेतत्त्वावर देण्याबाबत ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला.
संचालक मंडळाने हंगाम २०२२-२३ पासून बँकेने ठरवून दिलेल्या टॅगींगनुसार कारखाना चालविण्यास असमर्थता दर्शविली व कारखाना परत ताब्यात घेणेकामी बँकेस पत्रान्वये कळविलेले होते. त्यामुळे बँकेस कर्जाच्या सुरक्षिततेसाठी व कर्जासतारण असलेल्या सुरक्षिततेसाठी कारखान्याची चल व अचल मालमत्तेचा ताबा घ्यावा लागलेला आहे.
कारखान्यावर पुन्हा शासनातर्फे प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा बँकेच्या सहकारी बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्ती करण्यात आली होती. गेल्यावर्षी कारखाना बंद पडला व आगामी गाळपासाठीचा आहेत.
हंगाम सुरू होण्याची शक्यता देखील धूसर झाली आहे. त्यामुळे कर्जाची थकबाकी वाढतच चालली. याच अनुषंगाने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. तसा ठरावही संचालक मंडळाने मंजूर केलेला आहे. बँकेने ठराव मंजूर केल्यानंतर जिल्हा बँकेतर्फे निविदा व करार प्रक्रिया. करण्याच्या हालचाली जलद सुरू झाल्या असून आगामी काळात ऊस उत्पादक कामगार व सभासदांची , या ठरावावर कार्य भूमिका राहणार या गोष्टी आगामी काळातच स्पष्ट होणार.
जिल्हा बँकेचे पत्र मिळाले. तनपुरे कारखाना चालविण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन केले. त्यामुळे बँकेच्या एनपीएचा प्रश्न सुद्धा मिटला. पुनर्गठन प्रसंगी व नंतर बँकेने कारखान्याला अर्थसहाय्य केले नाही. तरी, कर्ज हप्ता व व्याजापोटी ५० कोटी भरले आहेत. १६० कोटींच्या थकीत कर्जासाठी कारखान्याची १००० कोटींची मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहे. संचालकांवर दायित्व ठेवण्याचे कारण नाही. –
नामदेवराव ढोकणे (माजी चेअरमन),डॉ. तनपुरे सह. साखर कारखाना.



