राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील महत्वाची व राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडीत सर्वांचे लक्ष आणि अनेक नाट्यमय घडामोडी होऊन दोन्ही – उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीतून गणपत अंबादास पेरणे यांची सरपंचपदी निवड झाली.
तांदुळवाडी ग्रामपंचायतचे १३ सदस्य असून गायत्री अमोल पेरणे यांचे सरपंच पद अतिक्रमण मुद्द्यावरून जुलैमध्ये अपात्र झाले होते. रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीच्या मंडलाधिकारी वैशाली सोनवणे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी सोनाली जऱ्हाड, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे यांनी सहकार्य केले. सरपंच पदासाठी गणपत पेरणे, विराज धसाळ व स्वाती धसाळ यांनी अर्ज दाखल केले. विराज धसाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पेरणे व सौ.धसाळ या दोन उमेदवारांमध्ये सरपंचपदासाठी लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी सहा – सहा मते मिळाली. त्यानंतर ईश्वर चिठ्या टाकण्यात आल्या. ईश्वरी चिठ्ठीने गणपत पेरणे यांच्या बाजूने कौल दिल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे, ग्रा.पं. सदस्य विराज धसाळ, विक्रम पेरणे, निसार सय्यद, शिवाजी खडके, विमल पेरणे, शितल पेरणे, अश्विनी चव्हाण, शितल आढाव, अनिता निकम यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
यावेळी सूर्यभान म्हसे, बाळासाहेब पेरणे, शरद पेरणे, अशोक भालेराव, गहिनीनाथ पेरणे, दादासाहेब पेरणे, मच्छिंद्र पेरणे, अमोल पेरणे, उमेश पेरणे, संदीप म्हसे, नंदू पेरणे, भाऊसाहेब पेरणे, काशिनाथ चव्हाण, सुधीर धागुडे, दत्तात्रय पेरणे, काशिनाथ धागुडे, राहुल खेडेकर, डॉ. मच्छिंद्र मोरे, चंदू हंडाळ, संजय पेरणे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



