श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- हरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी नाना गलांडेला अटक करण्यासाठी भीमशक्तीचे सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली सूर करण्यात आलेले उपोषण आज आमरण उपोषण डी. वाय. एस. पी. डॉ. बसवराज शिवपुंजे यांनी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांना आश्वासन देत सदर आरोपीस आठ दिवसांच्या आत गजाआड करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती संदीप मगर यांनी दिली.
आज श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्या समोर भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण शेकडो कार्यकर्त्यांसह चालु करण्यात आले होते.
यावेळी मगर म्हणाले की, महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दलित समाजातील चार अल्पवयीन तरुणांना कबूतर चोरण्याच्या आरोपावरून अतिशय झाडाला लटकून निर्गुण पणे त्याच्या अंगावर लघवी करून त्याला मारहाण करण्यात आली असा प्रकार महाराष्ट्रातला काळीमा फासणारी घटना घडली आहे तरी या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे तरी आपण मुख्य सूत्रधार आरोपींना नाना गलांडे याला का बर अटक करत नाही असा प्रश्न संदीप मगर यांनी डीवायएसपी बसवराज शिवपुजे यांना केला आरोपी याने जर अटकपूर्व जामीन घेतला तर तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो कुटुंबांना दबाव आणू शकतो म्हणून त्याला जामीन मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करावे तसेच फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी पिडीत कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली यावेळी डी वाय एस पी डॉ बसवराज शिवपुजे आरोपी नाना गलांडे याचा शोध चालू आहे याला अटकपूर्व जामीन होणार नाही तुम्ही आम्हाला आठ दिवस द्या आम्ही त्याला अटक करू असे ठोस आश्वासन दिले त्यामुळे उपोषण स्थगित करत असल्याचे मगर यांनी सांगितले. जर आरोपीला आठ दिवसात आपण अटक न केल्यास श्रीरामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमशक्ती संघटना भव्य रस्ता रोको आंदोलन करू असे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी डीवायएसपी यांना सांगितले.
यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पातोरे, महिला उपजिल्हाध्यक्ष विजया बारसे, शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, उपाध्यक्ष अरुण खंडीझोड, महिला शहराध्यक्ष वंदना गायकवाड, उपशहराध्यक्ष जयश्री पवार, शहर सरचिटणीस प्रशांत भोसले, शहर संपर्कप्रमुख गौरव बागुल, चंद्रकांत येवले, सनी बारसे, बापू विधाटे, सचिन खांडरे, गुड्डू पंडित, सतीश गायकवाड, प्रदीप थोरात, नितीन त्रिभुवन, राम शेख, सुरज गायकवाड, आकाश जाधव, सचिन कोतकर, ऋषिकेश जाधव, तन्वीर शेख, अनिल गांगुर्डे, सतीश गायकवाड, सुनिता भाकरे, कुणाल वाहुळ, अमन सय्यद, सनी जगताप, दर्शन बारसे, अलोक बार्शी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



