श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-मतमाऊली यात्रा अमृत महोत्सवानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटी व आबासाहेब गवारे मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने हरेगाव फाट्यावर आयोजित नाशिक ब्लड सेंटर यांचे रक्तदान शिबिरात रक्तदाते कडून 42 बॅग्स मिळाल्या शिबिरास ऊत्तम प्रतिसाद मिळाला.
यात्रेकरू उस्फुर्त शिबिरात सहभागी झाली.प्रथमच केलेला हा प्रयोग यशस्वी झाला .रक्त दात्यांची सर्व सुरक्षित व्यवस्था करण्यात आली होती .रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी व रेड क्रॉस चेअरमन किरण सावंत पाटील यांचे हस्ते झाले .प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार तथा व्हाइस चेअरमन मिलिंद वाघ ,सचिव सुनील साळवे,लोकनियुक्त सरपंच आबासाहेब गवारे,नाशिक ब्लड बँक प्रमुख गिरीश वैद्य होते. यावेळी बोलताना अध्यक्ष किरण सावंत म्हणाले दर तीन महिन्याला ब्लड डोनेशन कॅम्प भरविण्याचे नियोजन करू.कारण आज देशात रक्ताची कमतरता भासत आहे.या पार्श्वभूमीवर रेड क्रॉस पुढे येऊन नागरिकांना ब्लड दोनेट करण्याचे आवाहन करेल व विशेष दिनानिमित्त या प्रकारची शिबिरे घेतली जाणार असल्याचे किरण सावंत यांनी सांगितले. आभार आबासाहेब गवारे यांनी मानले .
शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी चेअरमन किरण सावंत,व्हाइस चेअरमन मिलिंद वाघ,सुनील साळवे,आबासाहेब गवारे, श्रावण भोसले,पोपटराव शेळके,प्रवीण साळवे,विनोद हिंग्निकर,सुरेश वाघूले,संजय दुशींग,साहेबराव रक्टे,नानासाहेब मुठे, सोपान नन्नवरे, कांतीलाल शिंदे,मधुकर येडे,सुधाकर पीलगर, डी. एन.माळी,गोरक्षनाथ आंबेकर,सविता साळुंके,शोभा शेंडगे ,आबासाहेब गवारे मित्र् मंडल सर्व सदस्य,गिरीश वैद्य नाशिक ब्लड सेंटरचे सर्व स्टाफ आदींनी विशेष परिश्रम घेतले .



