spot_img
spot_img

मुलीची छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करा;  मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):-बेलापूर येथील जे.टी.एस. कॉलेजमध्य हिंदू धर्माच्या मुलीची काही मुसलमान समाजाच्या मुले अनेक दिवसापासून छेडछाड करत होते या मुलांना पोलिसांनी वेळेत अटक केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी या सर्व आरोपींना कडक शासन करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,छेडछाड करणारा मुलगा हा मुस्लिम समाजाचा असुन हा लवजिहादचा प्रकार आहे. देशभर काही कट्टरपंथी जिहादी संघटनांच्या सांगण्यावरुन आपल्या देशात जातिय तेढ निर्माण करून देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून देशविरोधी कटकारस्थान करत असल्याचे अनेक घटना घडत आहे. बेलापूर जे.टी.एस. कॉलेजमध्ये देखिल ज्या हिंदू मुलीची छेडछाड करण्यात आली या घटनेतील आरोपी देखील अशाच जिहादी संघटनांच्या आमिषाला बळी पडलेले दिसत आहे. सदर घटनेतील मुस्लिम समाजाच्या मुलावर व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करून पिडीत मुलीला न्याय देण्यात यावा तसेच आपल्या कॉलेजमधील विद्यार्थीनीला न्याय मिळवून न देणार्‍या व आरोपीला गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळेल असे काम केल्याने त्या शिक्षकावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

व या घटनेमध्ये सहभाग असलेल्या सर्व आरोपींना व या आरोपींना सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष कुणाल सूर्यवंशी विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यश जऱ्हाड यांनी म्हटले आहे. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे उपजिल्हाध्यक्ष महेश सोनीे, मनसे तालुकाध्यक्ष डॉ संजय नवथर, मनसे शहरअध्यक्ष सतिश कुदळे,मनसे तालुका संघटक विलास पाटणी, तालुका सचिव भास्कर सरोदे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!