नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा शहरातील ड्रेनेजचे पाणी नदीच्या पात्रात सोडले जात असून यामुळे पोटदुःखीच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सांडपाणी प्रक्रिया प्लांटसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी नगरसेवक सुनील वाघ यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात ,म्हटले आहे की नेवासा शहरातील जवळपास सर्व गटारी भुयारी( सिमेंट पाईप टाकून) झालेले आहेत परंतु हे सर्व ड्रेनेजचे पाणी प्रवरा नदी पात्रात सोडले जात असून त्यामुळे प्रवरा नदी पात्रातील पाणी दूषित झाले आहे व त्याच कारणामुळे पोटांचे विविध आजार शहरांमध्ये पसरलेले आहेत प्रवरा नदी पात्रामध्ये जाणारे हे सांडपाणी यावर प्रक्रिया केली जावी व त्याकरिता एसटीपी प्लांट होणे अति गरजेचे आहे व त्याकरिता निधी मिळावा अशी मागणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नेवासा येथील दौऱ्यात केली आहे.
यावर तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकरिता निधी मिळवून देतो असे आश्वासन दिले.निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राज्य प्रवक्ते नितीन दिनकर, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, शेजुळ,अशोक ताके, किशोर गारुळे, गणेश परदेशी,शाम मापारी,ॲड.संजीव शिंदे,भास्कर कणगरे,सुभाष कुलकर्णी,कैलास करंडे उपस्थित होते