राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-निळवंडे कालव्याच्या कामाला गती मिळावी यासाठी आ प्राजक्त तनपुरे यांच्यासह २१ गावातील लाभधारक शेतकऱ्यांनी नगर- मनमाड महामार्ग आडवत रास्ता रोको आंदोलन केले. निळवंडे कालव्याच्यांच्या कामांना तातडीने गती दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा आ.प्राजक्त तनपुरे यांनी दिला.१ तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. नंतर कालवा पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या आश्वासानंतर तात्पुरत्या स्वरूपात रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आल आहे.
निळवंडे उजव्या कालव्याचे कामे त्वरीत पुर्ण करावीत,तांदुळनेर येथील वन विभागाच्या हद्दीतील कामे त्वरीत सुरू करावीत, कणगर वडाचे लवण येथे सुरू असलेल्या कामाला गती मिळावी. पाटचाऱ्यांची कामे तात्काळ सुरू करावी यासाठी आ.प्राजक्त तनपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह निळवंडे कालवा कृती समिती व लाभधारक शेतकऱ्यांनी केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी हे सरकार गेंड्याच्या कातड्याचे सरकार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेफिकीर असून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन जन आंदोलन उभारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ.प्राजक्त तनपुरे यांनी निळवंडे कालव्याच्या कामाबाबत सरकारवर ताशेरे ओढून आमच्या लाभधारक शेतकऱ्यांची भावना सरकारने लक्षात घेऊन कालव्याच्या कामांना गती न दिल्यास पुन्हा आणखी तीव्र आंदोलन छेडु असा इशारा दिला.
या आंदोलनात सुजित वाबळे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, , अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष दादासाहेब पवार, सोपान हिरहळ, गंगाधर गमे, किरण गव्हाणे, उपसरपंच पप्पू माळवदे, सुखदेव बलमे, रघुनाथ मुसमाडे, बापूसाहेब कोबरणे, सुधाकर मुसमाडे, गणेश हारदे, विजय बलमे, भास्कर गाडे, भगीरथ नरोडे, दत्तात्रय बलमे, मंजबाप कोबरणे, उपसरपंच मनोहर कोबरणे, रमेश कोबरणे, राजेंद्र कोबरणे, जयसिंग घाडगे, भारत कोबरणे, रमेश कोबरणे, विजू हारदे, नाना कोबरणे, अशोक उरहे, रामा बर्डे, वेणूनाथ लांबे, निलेश ओहळ, प्रणय कोळसे आदींसह परिसरातील लाभधारक शेतकरी सहभागी झाले होते.



