नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- सामजिक कार्यात असणारे अजिक्य पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दाखवत आज आगळा वेगळा उपक्रम करत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन नेवासा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ देऊन अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी व्यासपीठावर बाजार समिती चे सभापती नंदकुमार पाटील , प्रकाश सोनटक्के रामभाऊ जगताप, ॲड.चंगेडिया उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक वेक्तीने वाढदिवस , तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी वर्गाला मदत होईल म्हणून मराठा बोर्डिंग मध्ये शालेय साहित्य अथवा अन्नदान स्वरूपात मदत करावे असे आव्हान नेवासा बुद्रुक येथील सरपंच प्रकाश सोनटक्के यांनी केले.
पवार कुटुंबाच्या सामाजिक उपक्रमा बद्दल त्याचे सर्व स्थारतून अभिनंदन केले जात आहे इंजिनिअर अजिक्य पवार यांचे वडील नितीन पवार व त्यांचे कुटुंब हे समाजातील गोर गरीब नागरिक व वंचितांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असतात , शैक्षणिक, व सामाजिक कार्य अश्या विविध ठिकाणी समाज सेवेच्या माध्यमातून ते नेहमीच काम करतात
तर कार्यक्रम प्रसंगी सतिष पिंपळे नितीन पवार, सुधीर बोरकर,अनिल मारकळी, संभाजी ठाणगे, सुरेश ढोकणे, आशिष कावरे,प्रवीण मारकळी मिलींद मापारी, यांच्या सह बोर्डिंग मधील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.