राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आगामी गणेश उत्सव व मिरवणूकी दरम्यान राहुरी तालूक्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. याची खात्री आम्ही देतो. असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपूरे यांनी आज राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सव व ईद ए मिलाद २०२३ शांतता बैठकी दरम्यान केले.
राहुरी येथील पोलिस प्रशासनाच्या वतीने आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी राहुरी शहरातील पांडुरंग लाॅन्स येथे आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपूरे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपूरे, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपूरे, माजी उप नगराध्यक्ष रावसाहेब तनपूरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, मुज्जूभाई कादरी, देवेंद्र लांबे, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, विलास कुलकर्णी, मंदार धुमाळ, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे आदि उपस्थित होते.
मिरवणूकीच्या दिवशी ईद ए मिलाद असल्याने ईद त्या दिवशी साजरी न करता दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाकडून घेण्यात आला. या निर्णयाचे आमदार प्राजक्त तनपूरे यांनी कौतुक केले. आनंद घेता येईल व दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही. याची काळजी घेऊन गणेश उत्सव व मिरवणूक शांततेत व आनंदात साजरी करण्याचे आवाहन आमदार तनपूरे यांनी केले.
अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगीतले कि, प्रत्येक मोठ्या मंडळाला एक पोलिस कर्मचारी पालक म्हणून देणार. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी समन्वय ठेवावा. गणेश उत्सवा दरम्यान व मिरवणूकीत डिजे चा आवाज मर्यादित ठेवावा. कार्यकर्त्यांनी कायदा व शिस्तीचे पालन केल्यास पोलिस प्रशासन तूमच्या पाठीशी उभे राहिल.
ज्येष्ठ पत्रकार अयुबभाई पठाण यांनी शहरात सामाजिक सलोख्याचा देखावा सादर करणाऱ्या दोन मंडळांना पहिल्या नंबरला १० हजार रुपए व दुसऱ्या नंबरला ५ हजार रुपए बक्षिस आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या हस्ते देण्याचे जाहीर केले.
तर राहुरी तालूका साऊंड असोसिएशन चे तालूका अध्यक्ष दिपक साळवे यांनी सांगीतले कि गणेश उत्सव व मिरवणूक दरम्यान दोन पेक्षा जास्त प्लाझ्मा व दोन पेक्षा जास्त टाॅप तसेच कर्ण कर्कश आवाज असलेल्या डिजेवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा आम्ही आमरण उपोषण करु. असा इशारा दिपक साळवे यांनी दिलाय.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, चाचा तनपूरे, देवेंद्र लांबे, सुनिल भूजाडी, मौलाना असलम, ॲड. राहुल शेटे, प्रतिक तनपूरे आदिंनी मनोगत व्यक्त करताना गणेश उत्सव व मिरवणूकी दरम्यान येणाऱ्या अडचणी प्रशासना समोर मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी मानून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.



