spot_img
spot_img

ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल  ॲड जूनियर  कॉलेजच्या मुलींच्या कबड्डी संघाची सलग दुसऱ्याही वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड व कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा क्रीडा संचालनालयामार्फत आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मुलींच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार दिनांक ८-सप्टेंबर २३ रोजी श्री . बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल, गणेगाव येथे खेळवल्या गेल्या. १४ व १७ वर्षे वयोगटात पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकुण १८ शाळांच्या मुलींचे संघ सहभागी झाले होते.

सदर स्पर्धेमध्ये ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या मुलींनी धडाकेबाज खेळी करत दोन्हीही गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. १७ वर्ष वयोगटात खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्या मुलींनी श्री संत महिपती विद्यालय, तांभेरे मुलींच्या संघाचा ४ अशा फरकाने दारुण पराभव केला व सामन्यातील अंतिम विजयी स्थान निश्चित केले तर १४ वर्षे वयोगटातही ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलच्याच मुलींनी बाजी मारत न्यू इंग्लिश स्कूल, देवळाली मुलींच्या संघाचा ४ फरकाने दारुण पराभव केला व विजयाच्या मानकरी ठरल्या. १४ वर्ष वयोगटातील प्रांजल मुसमाडे, तन्वी कोळसे, स्नेहल साबळे, श्रद्धा मुसमाडे, प्रणिता कोळसे, गौरी शेलार, अनुष्का मुसमाडे, समृद्धी शेलार, अनुराधा कोळसे, भक्ती उर्हे, अनुष्का कोळसे , श्रेया उर्हे, ज्ञानेश्वरी मुसमाडे, अनुष्का मुसमाडे मुली विजयी संघातील मानकरी ठरल्या.

तसेच १७ वर्ष वयोगटातील धनश्री काळे, श्रावणी शेलार, पियुशा शेलार, ऋतुजा आंबेकर, प्रतीक्षा खेडेकर, ईश्वरी खपके, श्रद्धा ओहोळ, सुहानी लोंढे, नम्रता उर्हे व मिष्कात पठाण यांनी यशस्वी होऊन विजयाच्या मानकरी ठरल्या.

सर्व यशस्वी विद्यार्थीनी खेळाडूंचे ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार सर, सेक्रेटरी मनीषा शेलार, प्राचार्य सुमित खालको, अमोल तोडमल, अरुण पारखे, अर्जुन मुसमाडे व सर्व शिक्षकवृंद तसेच सर्व पालकांनी अभिनंदन केले.

सदर खेळाडूंना शाळेचे अष्टपैलू क्रीडा शिक्षक श्री. सौरभ वरखडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!