spot_img
spot_img

प्रवरा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून चिंचोली येथे दुभत्या जनावरांतील रोग व चारा व्यवस्थापन याविषयी चर्चासत्र 

लोणी दि १३( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित, कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुताकडून जनावरांच्या लंम्पी आजाराविषयी चर्चासत्राचे मौजे चिंचोली ता.राहुरी येथे कृषिदुत जोशी गुणवंत,घोलप सुरज,खर्डे सिद्धांत, गौरव पवार, ऋषिकेश जोंधळे, सचिन दाभाडे, प्रशांत कोल्हे यांनी चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात प्राचार्य,पशुसंवर्धन पदविका विद्यालय, फत्याबादचे डॉ.दादासाहेब मोकाटे, कृषी महाविद्यालायचे सहाय्यक प्राध्यापक गोरक्षनाथ आंत्रे यांनी शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांतील रोग व चारा व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी चिंचोली गावातील प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक अशोक गागरे ,प्रवरा ट्रक सोसायटीचे संचालक संभाजी पा.आरगडे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लाटे,माजी सरपंच गणेश हारदे, तसेच प्रगतशील शेतकरी जालिंदर पा.काळे,शंकरराव पा.लाटे,सर्जेराव लाटे ,अण्णासाहेब पा.काळे,अरविंद नलगे काचेश्वर काळे इत्यादी व ग्रामस्थ व दूध उत्पादक शेतकरी हे उपस्थित होते.

संस्थेचे कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक प्रा.रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र दसपुते, डॉ.दिपाली तांबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व कृषिदुताना मार्गदर्शन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!