राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रसाद शुगर कारखान्याचे कार्यस्थळावर आज मा. राज्यमंत्री आमदार श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांचे वाढदिवसानिमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले होते. या रक्तदान शिबीराचे उदघाटन कारखान्याचे वर्क्स मॅनेजर मा. श्री. संजय म्हस्के यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कारखान्यातील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरात कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड प्रतिसाद देत एकुण ५७ बॅग रक्तदान केले आहे. या सर्व रक्तदात्यांचे कारखाना व्यवस्थापनाने अभिनंदन करुन आभार मानले आहे. या शिबीरास रोटरी ब्लड बॅक राहुरी यांनी सहकार्य केलेले आहे.



