राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):समाजकल्याण विभाग व डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशनच्या दिव्यांग आधार व पुनर्वसन केंद्राच्या वतीने राहुरी तालुक्यातील जवळपास सातशे दिव्यांगाना साधन साहित्याचे वाटप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी वाजता होणार आहे.
राहुरी येथील पांडुरंग मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य कार्यक्रमास लाभार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.



