कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालय कोल्हार बु. ता. राहाता जि. अहमदनगर या ठिकाणी १२ सप्टेंबर २०२३ रोजी माधवराव खर्डे पाटील स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेचे हे ४० वे वर्ष होते या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ४१ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन या स्पर्धेचे निमंत्रक माजी सरपंच अँड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बी. वाय. शिरसाट (माजी विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर) होते. सर्वप्रथम माधवराव खर्डे पाटील व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुधीर वाघमारे यांनी केले व सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व सर्वांचे स्वागत करून स्पर्धेविषयी माहिती दिली. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शिवचरित्रकार राहुलजी पेरणे यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेमध्ये पारंगत होण्यासाठी वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे हे सांगून अनेक उदाहरणे दिली.
‘यावेळी त्यांनी माधवराव खर्डे पाटील यांच्या जीवनातील अनेक’ प्रसंगांची व त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली यानंतर कार्यक्रमाचे उदघाटक व स्पर्धेचे निमंत्रक माजी सरपंच अँड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी माधवराव खर्डे पाटील यांच्या अनेक आठवणी सांगून त्यांनी केलेली कामे व त्यांच्या कार्याची माहिती विद्याथ्यांना. सांगितली. त्यांच्याबरोबर अनुभवलेले
लहानपणीचे अनेक प्रसंग अँड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी सांगितले यानंतर या वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख शब्बीर शेख सर यांनी या वक्तृत्व स्पर्धेचा इतिहास सांगितला आणि या स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांना सांगितल्या यास्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र हे कर्मवीर जयंती कार्यक्रमांमध्ये देण्यात येतील याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. वाय. शिरसाठ यांनी माधवराव खर्डे पाटील यांच्या संपर्कामध्ये जे जे अनुभव त्यांनी अनुभवले त्याविषयी माहिती सांगून माधवराव खर्डे पाटील यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. या वेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती आंधळे एस.बी. त्याचबरोबर गोरख खर्डे पाटील (उपसरपंच कोल्हार बु). प्रकाश खडें पाटील (उपसरपंच भगवतीपुर,) बी.के. खर्डे पाटील (सदस्य स्थानिक सल्लागार समिती )अजित मोरे पाटील,( सदस्य स्थानिक सल्लागार समिती )पांडुरंग पाटील देवकर, (सदस्य स्थानिक सल्लागार समिती), अहमदनगर गोड व्हॅल्यूअर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ श्रीकांत बेंद्रे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश खांदे,
त्याचबरोबर सुनील भणगे, सोपान देवकर सर, शशिकांत सोनवणे सर (मा. प्राचार्य) व पत्रकार राजमोहंमद शेख, पत्रकार सुहासजी वैद्य, पत्रकार सुभाष कोंडेकर व पत्रकार भोसले हे उपस्थित होते. शेवटी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक बाबासाहेब नवाळे सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी शिंदे, श्रीमती अलका लहामगे व श्री दिपक मगर यांनी केले.
संध्याकाळी पाच वाजता सर्व स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले यामध्ये लहान गटात १) प्रथम क्रमांक कु. शर्मा वैष्णवी रोशन (डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर) व कु. येवले दीपिका उत्तम (प्रवरा इंग्लिश मेडियम स्कूल (मुली) लोणी या दोन विद्यार्थीनीना प्रथम क्रमांक विभागून मिळाला २) कु. घोगळ गौरी किरण (श्री गणेश विद्यालय गणेश नगर) या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला ३) कु. खेरे राजेश्वरी बारकू (न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मळ) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला या गटामध्ये कु. हसे सान्वी संदीप (दि.ग.सराफ विद्यालय संगमनेर ) उत्तेजनार्थं प्रथम क्रमांक कु. गव्हाणे रुचिका आप्पासाहेब (श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी) उत्तेजनार्थं द्वितीय क्रमांक कु. खडें समृद्धी प्रताप (प्रवराहायस्कूल कोल्हार बु.) उत्तेजनार्थ व तृतीय क्रमांक मोठ्या गटामध्ये- १) कु. भदे प्राची प्रकाश (सौ. न भागीरथाबाई तनपुरे कन्या माध्यमिक न विद्यालय राहुरी) या विद्यार्थिनीने • प्रथम क्रमांक मिळवला २) कु. बेंद्रे धृवा राहुल (प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी), कु. घोरपडे संस्कृती कैलास (न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी निर्मळ), कु. जवादे अंकिता रोहिदास (श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी) या तीन विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक विभागून मिळवला ३) कु. शेळके. प्रज्योत प्रदीप (दि.ग.सराफ विद्यालय संगमनेर) या 3 विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवला तर कु. मांडुळे गायत्री बापूसाहेब 5 (न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु.) न उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कु. दुधाळे प्राजक्ता दीपक (डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर) न उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक कुः वानखडे श्रावस्ती आनंत (प्रवरा 7 हायस्कूल कोल्हार बु.) उत्तेजनार्थ न तृतीय क्रमांक मिळविला या सर्व • विद्याथ्र्यांना कर्मवीर जयंती कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम स्मृतीचिन्ह व न प्रशस्तीपत्रक देण्यात येतील अशी – माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर वाघमारे यांनी दिली.



