राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-मंगळवारी पुणे येथून मनमाड करिता जाणारी लाल परी.. रात्री अडीच वाजेची वेळ…. बस मध्ये अनेक प्रवासी झोपेत… लाल परी च्या मागील टायरने अचानक पेट घेतला.. काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन वाहकाचे लक्षात आले… सर्व प्रवासी लालपरी तून सुखरूप खाली उतरवले अन्यथा… मोठ्या दुर्दैवी घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली असती.. आग लागल्याची घटना समजताच राहाता नगरपालिकेचे अग्निशामक विभाग प्रमुख अशोक साठे आपल्या अग्निशामक पथकासह रात्री अडीच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आगीवर नियंत्रण मिळवले व काही क्षणात आटोक्यात आली व आगीच्या भक्षस्थानी सापडून उध्वस्त होणारी लालपरी सुद्धा वाचली…. वाहन चालक वाहक व प्रवासी या सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला
याबाबतचे वृत्त असे की पुणे मनमाड ही लालपरी बस पुण्याहून मनमाड कडे जात असताना नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी निर्मळ
हद्दीतील हॉटेल विश्वदीप जवळ या गाडीचे मागील टायरला रात्री अडीचच्या सुमारास आग लागली होती. टायरने जोरदार पेट घेतला आगीच्या ज्वाला निघत होत्या. दरम्यान बस मधील अनेक प्रवासी हे साखर झोपेत होते ही आग लागल्याची बाप चालकाच्या निदर्शनास येतात त्यांनी बसवर ताबा मिळवत बस एका कडेला थांबवली व तातडीने सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले तोच ही घटना दूरध्वनीवरून राहाता नगरपालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख अशोक साठे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एवढ्या रात्री अग्निशामक घेऊन आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व तातडीने टायरमुळे पेट घेतलेल्या बसची आग आटोक्यात आली त्यामुळे लाल परी वाचलीच परंतु होणारी मोठी दुर्घटना सुद्धा कळली एवढ्यावरच न थांबता अशोक साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाल परीचे चालक व वाहक यांच्या मदतीने मध्य रात्रीच्या वेळी सर्व प्रवाशांना धीर देत या प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसून पुढील प्रवासासाठी त्यांची वाटचाल करून दिली काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती केवळ दैव बलवत्तर म्हणून मध्यरात्री संबंधित लाल परीचे चालक व राहत्याचे अग्निशामक पथक आमच्यासाठी देवदूत म्हणून आल्याची भावना व्यक्त करत प्रवाशांनी या सर्वांचे आभार मानत आपला प्रवास सुरू केला मध्यरात्री गाडीला आग लागल्यानंतर आपल्याला मदत मिळेल का नाही पुढील प्रवास केव्हा होईल करा तर इथेच जागाव लागेल अशा एक ना अनेक समस्या या प्रवाशासमोर भेडसावत होत्या परंतु या सर्व समस्यातून मार्ग काढत त्यांना स्थानिकांनी व राहता नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मोठी मदत केली ही मदत न विसरणारी असल्याचे बसच्या चालकाने सांगितले
आग विझवणे हे तर आमचं कर्तव्यच आहे परंतु अगदी मध्यरात्री बसने पेट घेतल्याचा फोन येतो कुठलाही विलंब न होता तात्काळ हा फोन रिसीव्ह केला जातो आणि क्षणाचाही अवधी न दवडता माझे सहकारी प्रमोद बनकर चालक,गोरक्ष साळवे आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी जातो आम्ही वेळीच गेल्याने शासनाच्या लाल परीच होणार मोठ नुकसान टळलं तसेच प्रवाशांनाही आम्ही सुरक्षित बाहेर काढू शकलो याचे मनस्वी मोठे समाधान आहे
अशोक साठे( अग्निशामक विभाग प्रमुख)राहाता नगरपरिषद राहता



