spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास्थळी खोकर ग्रामस्थ यांची भेट

माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली.(सराटा) या ठिकाणी “मराठा आरक्षणासाठी” आमरण उपोषण करणारे मा. श्री – मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थळीं भेट घेऊन , कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर वतीने तसेच ग्रामपंचायत कार्यालय खोकर, म्हाडा गृहनिर्माण संस्था श्रीरामपूर., बेलापुर विविध कारी सोसायटी. , महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजि नं एन जी पी ४५११ यांचे वतीने जाहिर पाठिंबा चे निवेदन देण्यात आले व उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांचे बरोबर चर्चा करण्यात आली.

तसेच ज्या आंदोलकांवर गोळीबार झाला ते युवक कार्यकर्ते श्री- विठ्ठल सुकदेव रंधे पाटील यांची देखील योगायोगाने भेट झाली व चर्चा करण्यात आली याप्रसंगी . काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री – बाळासाहेब इंद्रभान सलालकर., कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री-राजु चक्रनारायण व खोकर ग्रामपंचायत चे उपसरपंच आदरनिय श्री- दिपकराव काळे पाटील. काँग्रेस चे युवा कार्यकर्ते श्री- अमृत पाटील सलालकर.. ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे जिल्हा संघटक तथा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष – श्री – दादासाहेब बबनराव चक्रनारायण. इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!