कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्टस क्लबच्या वतीने दि. १६ व १७ सप्टेंबर रोजी विवेक कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव येथे १४, १९ वर्षांखालील गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. विवेक कोल्हे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा कोपरगाव, राहाता, येवला, वैजापूर, संगमनेर व श्रीरामपूर या सहा तालुक्यांसाठी मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी तीनही गटांत प्रत्येकी १० अशी ३० बक्षिसे रोख स्वरुपात आणि ४५ चषक ठेवण्यात आले आहेत. त्यात मुली व महिलांसाठी ९ रोख बक्षिसे १२ चषक राखीव ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक तालुक्यासाठी १४ व १९ वयोगटासाठी एकूण २४ चषक देणार आहे. ही स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने होणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ‘स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कोपरगाव चेस व स्पोर्टस क्लबचे सदस्य प्रमोद वाणी, संकेत गाडे, नितीन सोळके, राजेंद्र कोळपकर, साक्षी गाडे, श्रेयस गाडे, यश बंब, नितीन जोरी, प्रशांत चव्हाण, लक्ष्मण सताळे, संदीप कवडे, वैभव सोमासे, राजीव बोधक, राहुल कवरे, नितेश बंब, गणेश कोळपकर, निखील धोंगडी, नूपुर संचेती, राधेशाम मालजी, अथर्व • थोरात, तन्मय महाजन, विशाल, पंडोरे आदी प्रयत्नशील आहेत.



