लोणी दि.२(जनताआवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज केंद्रीय शिक्षण बोर्डाची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली .केंद्रीय शिक्षण बोर्ड न्यू दिल्ली द्वारा आयोजित ताण तणाव या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन रिजनल ऑफिस पुणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून नगर येथील एम आय आर सी शाळेचे प्राचार्या डॉ. पराग अग्रवाल आणि आयकॉन पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ आराधना राणा उपस्थित होत्या. अशी माहीती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील अनेक सीबीएसई शाळांच्या शिक्षकांनी कार्यशाळेत उपस्थित राहून मानसिक ताण-तणावाचे अध्ययन केले . शाळेतील विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या न त्या कारणाने मानसिक ताण तणाव सहन करीत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा, पालकांच्या अपेक्षा शिक्षकांचा दबाव सहन करावा लागतो आणि त्या कारणाने विद्यार्थी नेहमी तणावाखाली असतात .त्याचप्रमाणे शिक्षकांना जबाबदारी पार पाडताना कुटुंब आणि शाळा या दोघांचा समतोल राखताना तणावातून जावे लागते . त्यातून मानसिक ताणतणावामुळे आज कमी वयातील विद्यार्थ्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला रक्तदाब, डायबिटीस इत्यादी सारखे आजार जडत आहेत. त्यातून मुक्तता करण्यासाठी योग्य प्रशिक्षण शिक्षकांना देणे गरजेचे असल्याचे मत प्रशिक प्रशिक्षकांनी मांडले. तान तनावातून मुक्तता मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या क्लुप्त्या आणि शास्त्रीय पद्धतीचे धडे शिक्षकांना मिळाले .
शिक्षकांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना हसत खेळत अभ्यास करून अभ्यासाचे बोजा म्हणून न घेता तो जीवनाचा भाग आहे आणि तो स्वीकारावा लागेल या पद्धतीचे शिक्षण देता येईल, असे मत प्रशिक्षकांनी मांडले. आजच्या युगातील विद्यार्थ्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला ताणतणाव विरहित जीवन जगण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत शाळेचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या आरंभी स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपस्थिताच्या हस्ते पूजा करून आदरांजली वाहण्यात आली. आभार श्री अमोल म्हस्के यांनी मानले. कार्यक्रम प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सौ उलका आहेर, श्री प्रमोद काळे ,श्री संतोष शेंडे श्री कदिर शेख ,श्री गोविंद तांबे इत्यादींनी परिश्रम घेतले.