नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):-महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर, समाजकल्याण विभाग अहमदनगर व डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाउंडेशनच्या दिव्यांग आधार व पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जेईई, नीट,एमएचई -सीईटी ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीना टॅबचे वाटप करण्यात येणार असून याच दिवशी दिव्यांगाना साधन साहित्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे
राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वाटपाचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मनमाड रोड या ठिकाणी दिनांक १६ सप्टेंबर शनिवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तर निशा लॉन्स येथे दुपारी तीन वाजता दिव्यांगाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे
अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना याचे वाटप होणार असून या भव्य कार्यक्रमास लाभार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाज्योती तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



