spot_img
spot_img

जर्मंनीतील विश्व धर्म संमेलनात बेलापूरच्या स्वामी गोविंद देव गिरींचा सहभाग

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ) :- अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी समितीचे खजिनदार येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या “विश्व सर्व धर्म संमेलनात” नुकताच सहभाग घेतला.

तीन दिवस चाललेल्या या बहुधर्मीय संमेलनात जगातील विविध देश आणि धर्मातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यात भारताच्या वतीने हिंदु धर्म प्रतिनिधी म्हणुन स्वामी गोविंद देव गिरी महाराज सहभागी झाले होते. या संमेलनात हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन आदींसह अन्य बहुधर्मीय धर्मगुरूंनी या जागतिक धर्म संमेलनाच्या व्यासपीठावर आपापल्या धर्माची बाजु मांडून विचारमंथन व धार्मिक अदान प्रदान केले.

गेल्या वर्षीही इंडोनेशिया येथील धर्म परिषदेत भारताच्या वतीने स्वामी गोविंद देव गिरी यांनी हिंदु धर्म प्रतिनिधी म्हणुन सहभाग घेतला होता. ही सुखद बातमी मिळताच गाव परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!