श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):– श्रीरामपूर येथील नारायणराव गायकवाड व सौ लता गायकवाड यांचे सुपुत्र व विलास पुंड व सौ विजया पुंड यांचे जावई लेफ्टनंट कर्नल डॉ सोमेश्वर गायकवाड सैन्य दलाच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीच्या कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
यावेळी शहीद स्मारकास सेवानिवृत्ती लेफ्टनंट कर्नल डॉ सर्जेराव नागरे व सत्कारमूर्ती लेफ्टनंट कर्नल डॉ सोमेश्वर गायकवाड यांच्या हस्ते अहमदनगर येथून आलेले आर्मड रिडीमेंट ब्रॅन्ड पथकाच्यावतीने शहीद धून वाजवून पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान सेवापूर्ती सोहळा निमित्त कर्नल सोमेश्वर गायकवाड यांची श्रीरामपूर शहरातून शिवाजीरोड, मेनरोड या ठिकाणावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली अनेक ठिकाणी डॉ गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर स्वयंवर मंगल कार्यालय येथे सेवापुर्ती सोहळ्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल डॉ सर्जेराव नागरे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे यांनी डॉ.सोमेश्वर गायकवाड यांचे जीवन चरित्र व्यतीत गरीब देश सेवेकरिता प्रेरित होऊन सेनादलातील सेवा पूर्ण करत पुन्हा निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी डॉ सोमेश्वर गायकवाड तयार असल्यास असल्याबाबत माहिती दिली .
त्रिदल सैनिक व माजी सैनिक संघटना यांच्याकडून सन्मान करण्यात आला. या यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आजी माजी संघटना फाउंडेशन सुभेदार डोंगरे त्यांचे सर्व पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,सिद्धार्थ मुरकुटे, सचिन गुजर ,बाबासाहेब दिघे ,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ दिलीप शिरसाठ, डॉ अजिंक्य गिरमे, डॉ.बारहाते, डॉ. जी एल पवार ,डॉ सुशील पवार ,डॉ निर्मल पवार, डॉ. पेटकर डॉ. चव्हाण, डॉ विजय गायकवाड, डॉ रवींद्र जगधने, डॉ शरद सातपुते, व इतर सर्व डॉक्टर यावेळी उपस्थित होते वीर माता व पिता बडाख, नारायण डावखर, प्रेमचंद कुंकुलोळ, संजय जोशी ,दत्तात्रय साबळे, भगवान कुंकूलोळ, भाऊसाहेब मुळे, हरकल, अनिल कुलकर्णी ,जालिंदर कुऱ्हे, वृद्धेश्ववर कुऱ्हे,प्रभाकर कुऱ्हे,गायके पाटील,प्रकाश चित्ते, अशोक अभंग,अप्पासाहेब वाघोले, हरीभाऊ गायकवाड, शरद कळमकर, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले.तर आभार डॉ. श्वेता पुंड यांनी मानले.



