spot_img
spot_img

लाखगंगा येथील ग्रामसेवक पदभार सोडत नसल्याने संतप्त महिला सरपंच व सदस्यांनी सामुहिक राजीनामा देण्याचा इशारा

वैजापूर (जनता आवाज वृत्तसेवा):-  बदली होऊनही १४ वर्षांपासून ठाण मांडून बसलेला ग्रामसेवक पदभार सोडत नसल्याने संतप्त महिला सरपंच व सदस्यांनी सामुहिक राजीनामा देण्याचा इशारा जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

वैजापूर तालुक्यातील लाखगंगा 

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पदी प्रशासनाच्या आशिर्वादाने हा ग्रामसेवक १४ वर्षांपासून ठाण मांडून बसल्याचा प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील लाखगंगा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून २००९ पासून एस जे राठोड हे करीत आहेत.राठोड हे वादग्रस्त ग्रामसेवक आहे.त्यांनी गोदावरी पुर मदत निधीत घोटाळा केल्याचा त्यांचेवर आरोप आहे.त्यांच्या कार्यकाळात लाखगंगा ग्रामपंचायतीचा विकास खोळंबला आहे.ते गावात हजर राहत नाही.सरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नाही.१८ जुलै रोजी त्यांची बदली झाली.मात्र ते पदभार सोडण्यास तयार नाही.त्यामुळे लाखगंगा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सामुहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर सरपंच उज्वला सचिन पडोळ, उपसरपंच अर्जुन भागवत मोरे, सदस्य वैशाली विलास मोरे, कल्पना शिवाजी मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!