spot_img
spot_img

देवळाली प्रवरा येथे कदम वस्तीवर बैलपोळा उत्साहात साजरा

देवळाली प्रवरा (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गणपती चौक व कदम वस्ती चारी नंबर चार येथील कदम वस्ती परिवाराच्यावतीने बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत काबाडकष्ट करणाऱ्या बैलाप्रती हा दिवस म्हणजे त्याच्या बद्दलची असणारी आस्था याचीच उतराई आहे म्हणून  आजच्या दिवस बैल व बैलाला सजवली जाते. त्याचबरोबर त्याची आज पूजन केले जाते. ही परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे. या दिवशी शेतकरी वर्ग हा मोठ्या मनाभावाने आपल्या सर्जाराजाची मोठ्या उत्साहात त्याला गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

बैलपोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्या या दिवशी अत्यंत आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. त्यानुसार कदम पाटील परिवाराच्यावतीने डीजेच्या निदानात बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने  सहभागी झाला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक कदम यांच्या पुढाकाराने हा बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!