लोणी दि.१( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते पदमभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी येथे सॅन्डोझ फार्मा, मुंबई व ग्लेनमार्क फार्मा, संभाजीनगर या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. सोमेश्वर मनकर यांनी सॅन्डोझ फार्मा व ग्लेनमार्क फार्मा, या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते. प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी, व इतर हि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हि संधी उपलब्ध करून दिली होती. सुमारे ३७ पदविका व २५० पदवी व ३४ पदवीत्तर मध्ये शिकत असलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कॅम्पस मुलाखती मध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी प्रवरा फार्मसी च्या पदवीत्तर विभागातील वैभव मुर्तडक या विद्यार्थ्याची निवड सॅन्डोझ फार्मा मध्ये सुमारे ३.६० लाख वार्षिक पगारावर उत्पादन विभागात झाली. तसेच तर तीन विद्यार्थी अनुक्रमे शुभम गिरगे, कुशल थोरात आणि प्रतिक्षा मुळे यांची निवड ग्लेनमार्क फार्मा या कंपनी मध्ये वार्षिक वेतन १.४४ लाख या वरती झाली. सॅन्डोझ फार्मा यांचे तर्फे श्री जालिंदर सागर, श्री सातॊस्कर व श्री समीर चव्हाण तर ग्लेनमार्क फार्मा, यांचे मार्फत श्री ज्ञानेश्वर गोरे, श्री अमित मांगले, व श्री पवन पवार हे तज्ज्ञ मंडळी मुलाखती साठी महाविद्यालयात आले होते.
श्री. जालिंदर सागर यांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यलाय घेत असलेल्या परिश्रमाचे कौतुक केले व त्यांना मोलाचे मार्दर्शन केले. तर श्री. गोरे यांनी प्रवरा परिसरातील विद्यार्थी कसे प्रगल्भतेने कंपनी मध्ये काम करतात हे सांगितले. अंतीम वर्षाच्या परीक्षेपूर्वीच मिळालेल्या नोकरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झाले. संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून अश्या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जाते. महाविद्यालयात या साठी स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून नोकरी उपलब्ध करून देण्यामध्ये प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालय लोणी हे अग्रभागी आहे. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. सोमेश्वर मनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख श्री मनोज परजणे यांनी तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील, प्राचार्य डॉ संजय भवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
मी सामान्य कुटुंबातील आहे.प्रवरेत शिक्षणांसोबतचं विविध शिष्यवृत्ती,कमवा आणि शिका योजना यामुळे आर्थिक अडचण येत नाही.शिवाय मुलाखत तंञ विविध कौशल्य यामुळे हे यश मिळाले आहे यांतून आई-वडीलांचे स्वप्नपुर्ण झाले यामध्ये महाविद्यालयांचा सहभाग मोठा आहे.
– वैभव मुर्तडक