10.6 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

पोलीस प्रशासनाने चैन स्नॅचिंगच्या घटना रोखाव्यात- स्नेहल खोरे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना दिवसोंदिवस वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत हि बाब गंभीर असून सायंकाळच्या दरम्यान महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबडणा-या आरोपींचा शोध लावून कडक शासन करावे अशी मागणी माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील अनेक महिला सायंकाळच्या वेळी कामानिमित्त अथवा फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. अशावेळी संधी साधत महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबडण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. अशोक टॅाकीज, थत्ते मैदान, भळगट हॅास्पीटल, मोरगे वस्ती कॅनॅाल रोड परिसरात एका तासात ४ महिलांचे मंगळसुत्र ओरबडण्याची घटना घडली. या ठिकाणी गस्त घालण्यासाठी पोलीसांची नेमणूक होणे गरजेचे आहे अन्यथा अशा घटना वारंवार घडू लागल्या तर महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील होईल अशी चिंता खोरे यांनी व्यक्त केली.
पुढील महिन्यापासून गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीसह धार्मिक ऊत्सवांची सुरवात होणार आहे. या दरम्यान असंख्य महिला कालिका माता मंदिर, वढणे वस्ती, काच मंदिर, गायत्री मंदिरात दर्शनाला येत असतात मोठा अनर्थ घडण्याआधी पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!