लोणी दि.१( जनता आवाज
वृत्तसेवा ):-मुलांनी टिव्ही मोबाईल पेक्षा वाचन करून आपले सामान्य ज्ञान वाढवावे. महापुरुषांचे कार्य समजून घेत असतांनाच जिल्हाची ओळख वैशिष्टले याचा ही अभ्यास करा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि प्रियदर्शनी महीला मंडळाच्या संस्थापिका सिंधूताई विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कुल, लोणी येथे संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी अभिवादन करून वृक्षारोपण केले.तसेच लोणी बु ग्रामस्थांच्या वतीने देखिल अभिवादन करण्यात आले.या याप्रसंगी सरपंच कल्पना मैड,उपसरपंच गणेश विखे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहुल धावणे,माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे,अनिल विखे,दिलीपराव विखे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या,अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळक आणि महीलांसाठी स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या कार्यामुळेचं ग्रामीण महीला घराबाहेर पडून आज गावपातळीवर विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. विविध जयंती आणि पुण्यतिथी सांज-या होतांना त्यांच्या कार्याची सविस्तर ओळख विद्यार्थ्याना करून द्यावी. पुस्तकी ज्ञानासोबतच सामान्य ज्ञानातून विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.