श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- आजी आणि आजोबा हे कुटुंबाचे आधारस्तंभ. नातवंडे भाजी आजोबा यांच्यातील नाते अधिक बळकट व्हावे व नातवंडांना आपली संस्कृती आणि संस्काराची शिदोरी मिळावी हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्व शाळांमध्ये तसेच आपल्या शाळेत हा आजचा आजी – आजोबा दिवस साजरा करण्यात आला.
प्रथमतः मोठ्या उत्साहात नातवंडांसह शाळेत आलेल्या आजी-आजोबांचे शाळेचे मुख्याध्यापक सचिन मुळे मीना जायभाये, मंगल वाघ, स्मिता गोरे, संगीता गायकवाड,वैशाली रहाणे यांनी गुलाबपुष्प व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. येथील बँड त्यामुळे आजी आजोबांचे स्वागत मोठ्या जल्लोषात पार पडले. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती व स्व.दादा जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील कब-बुलबुल मधील विद्यार्थ्यांनी संचालन करत मान्यवरांना मानवंदना दिली. या कार्यक्रमास हास्ययोगा मार्गदर्शक डॉ.रीमा गोसावी व डॉ.माधवी राजे यांनी सर्व आजी आजोबा,शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांना हास्ययोगा प्रात्यक्षिकात सहभागी करून घेतले.
हास्य योगामुळे आजचे ताण-तणावाचे जीवनापासून आरोग्यदायी जीवन शैलीकडे कशी वाटचाल करावी याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे सर्व आजी आजोबा उत्स्फूर्तपणे मनमुरादपणे हास्ययोगात सहभागी झाले तसेच आजी आजोबांनी काही मैदानी खेळांचे देखील प्रात्यक्षिक सादर केले. विशेष आकर्षण ठरलेल्या संगीत खुर्ची खेळात सर्वांनी उत्स्फूर्त सहभागी घेतला त्यात आजींमध्ये शेजुळ आजी,मेहेत्रे आजी, धिवर आजी तर आजोबांमध्ये मुकुंद साबदे,रमणलाल बोरा,गोरक्षनाथ शिंदे यांनी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक पटकावले. अकोलकर आजी यांनी मधुर आवाजात गवळण सादर केली तर ह.भ.प.गोरक्षनाथ शिंदे महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून विभक्त कुटुंब व एकत्र कुटुंब याबद्दल सुंदर कथा सांगितली. न. पा. सेवानिवृत्त इंजिनियर लक्ष्मण नामदे,श्री.अत्तार, रमादेवी धिवर, श्री.जमादार, गणपत गांगुर्डे, अशोक अभंग तसेच उपस्थित आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले. दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत असे उपक्रम साजरे करून आपल्या नातवंडांना शिक्षणासोबत संस्काराचे धडे मिळत आहेत हे पाहून सर्व आजी-आजोबा भारावून गेले. नातवंडांसोबत खेळण्या-बागडणे व आपले मनोगत व भावना व्यक्त करण्यासाठी मंच उपलब्ध झाल्याचा आनंद सर्व आजी आजोबांच्या चेहऱ्यावर झळकत होता.यासाठी त्यांनी शाळेबद्दल व संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले व पुन्हा बालपण जगण्याची संधी अनुभवली याबद्दल धन्यवाद दिले.
शाळेतील विद्यार्थ्यांनीही आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन अशोक परदेशी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरत शेंगाळ,दत्तात्रय आबुज, संजय नामदे,दिनेश दीक्षित, विजय दवणे,दत्तू पोपेरे, चेतन केदारी,कीर्ती दांडापूर,अनिल गिरमे, विठ्ठल शिंदे,नूतन संसारे, ज्योती मोरगे आदींनी परिश्रम घेतले.