लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोणी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात विजय संपादन केला व त्यांची ३० सप्टेंबर २०२३ रोजी डेरवण जिल्हा- रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी खेळाडूंमध्ये मोहित नरवडे – प्रथम १४ वर्षे वयोगट मुले – उंच उडी
ओमराज घाडगे – द्वितीय १४ वर्षे वयोगट मुले लांबउडी, प्रतीक वसावे – प्रथम १६ वर्षे वयोगट मुले उंचउडी आणि द्वितीय- ३०० मीटर धावणे. आशिष वसावे – प्रथम -१६ वर्ष वयोगट मुले – लांब उडी महेंद्र पाडवी – द्वितीय
१६ वर्षे वयोगट मुले भालाफेक आणि लांबउडी प्रवीण भोये – द्वितीय १८ वर्ष वयोगट मुले – तिहेरी उडी यात यश संपादन केले.खेळाडूना प्राचार्य डॉ.बी.बी.अंबाडे, उपप्राचार्य श्री.के.टी आडसूळ, पर्यवेक्षिका सौ.एम एस जगधने,सौ. रत्नपारखी,क्रीडा संचालक श्री.डी.के जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे,क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे यांनी विशेष अभिनंदन केले.