spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य शक्ती – सुपर सी अभियानासाठी दिपालीताई ससाणे यांची निवड

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-  – बेंगलोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या महाअधिवेशनात महिलांच्या न्याय हक्कासाठी तसेच महिला मजबुतीकरण व सशक्तिकरनाच्या दृष्टीने शक्ती- सुपर सी  या अभियानासाठी श्री शक्ती ग्रुपच्या संस्थापिका व महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे यांची महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी दिपालीताई ससाणे म्हणाल्या की महिला सशक्तीकरण काळाची गरज असून महिलांच्या न्याय हक्कासाठी व महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणार असून त्यासाठी महिलांचे संघटन वाढवणार असल्याचेही त्या पुढे  म्हणाल्या. या निवडीबद्दल सौ ससाणे यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष.आ. नानाभाऊ पटोले,काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लवारूजी, राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवासजी, महाराष्ट्र प्रभारी उदय भानुजी,मितेंद्र भैय्या सिंग,एहसान खानजी,रोहित कुमारजी ,शक्ती-Super She महाराष्ट्र प्रभारी रुची भार्गव व प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!