लोणी दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरेच्या शैक्षणिक संस्थेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात.देशातील पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने अभियंता दिन विविध उपक्रम घेऊन साजरा केला.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी क्विझ कॉम्पिटिशन, टॅलेन्ट शो, आयडिया प्रेझेंटशन ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन कलागुणांचे प्रदर्शन केले.तसेच पुणे विद्यापीठ परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मिरेकल डेवलपर आणि इंटर्नचॉईस ह्या दोन कंपनीने स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ.गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना उत्तम अभियंता समाजास कशी मदत करू शकतो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा. ऋषिकेश भालेराव, प्रा. शितल पाटील, प्रा. अर्चना उगले, प्रा. प्रतिभा वाजे तसेच विदयार्थी प्रतिनिधी निखिल गडाख व रितू गोडसे यांनी विशेष परिश्रम घेतले.



