spot_img
spot_img

मा. जि. प. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पा. यांच्या हस्ते लोणी बु येथे आनंदाचा शिधा वाटप

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या पुरवठा विभागामार्फत आनंदाचा शिधा किट सर्वसामान्य धान्य दुकानावर उपलब्ध करून दिले आहेत. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे या आनंदाचा शिधा किट वाटपाचे जिल्हा परिषद अध्‍यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

शंभर रुपयाच्या या किटमध्ये रवा, पामतेल, साखर, हरभरा डाळ हे प्रत्येकी एक किलो याप्रमाणे चार वस्तूंचा समावेश आहे. प्राधान्यक्रम व अंत्योदय अशा लाभार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना शिधा मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात आली आहे. यावेळी लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच सौ कल्पनाताई मैड, सोसायटी चेअरमन अशोक पाटील धावणे, सदस्य भाऊसाहेब धावणे पाटील याचबरोबर लोणी बुद्रुक ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. लोणी बुद्रुक येथील रेशन दुकानदार सौ आशाताई अंबादास कडलग यांनी सर्वांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!