राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची लवकरच बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन दरबारी मार्ग काढून न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिले आमदार तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात अभियंता दिनानिमित्त अभियंतांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते .
अध्यक्षस्थानी अभियंता असोसिएशनचे अध्यक्ष संजय पवार होते. श्री तनपुरे म्हणाले की मी सन 2003 साली बारावी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला त्यावेळी मोठा अनुभव आला अभियंता होण्यासाठी खरी कसोटी लागत होती त्या काळातील विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट न विसरता येणारे आहेत शिक्षण वाया जात नाही त्याचा हमखास उपयोग होतो परंतु सध्याच्या बदलत्या युगात व स्पर्धेच्या काळात अमुलाग्र बदल घडत गेले केवळ बांधकाम क्षेत्रातच अभियंता नसून विविध प्रकारचे दालन खुले झाले आहे माहिती आणि तंत्रज्ञान हे मोठे क्षेत्र आहे अनेक ठिकाणी अभियंतांना वाव आहे बदलत्या काळानुसार शैक्षणिक क्षेत्र ही बदलत गेले सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयात असणाऱ्या जागांपैकी अनेक जागा रिकाम्या राहतात पूर्वी प्रवेश घेण्यासाठी जागा मिळत नव्हती महाविद्यालय चालविणे ही तारेवरची कसरत ठरली आहे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अभियंत्यांचे शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी शासनाने वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे जाणवते त्यासाठी यासंबंधी लवकरच अभियंत्यांची बैठक घेऊनअध्यादेशाचा वापर करून मार्ग काढत न्याय देण्याचा शासन दरबारी निश्चितच प्रयत्न करू.
आज ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातही तरुणांनी अभियंता शिक्षण घेऊन पदवी मिळविलेली आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्याला पूर्णपणे जाणीव असल्याचे नमूद केले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे ,सडे ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ, प्रवीण शिरसाठ, रवींद्र ढमाळ यांनी येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला .श्री ढमाळ यांनी राहुरी शहराचा नियोजनबद्ध विकास व आराखडा यात विना मोबदला योगदान देण्याचे जाहीर केले. बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर यांनी प्रास्ताविकात अभियंत्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास जोगिंदरसिंग कथुरिया, जगदीश सातभाई, स्वप्निल भास्कर ,रुपेश सुराणा ,रवींद्र जाधव अविनाश गाडे ,शुभम कल्हापुरे ,अक्षय दळे ,राहुल शेटे ,राजेंद्र येवले, शुभम लांबे ,अविनाश निमसे, पंकज आढाव यासह मोठ्या संख्येने अभियंता उपस्थित होते. महेश उदावंत यांनी आभार मानले.



