सोनई( जनता आवाज वृत्तसेवा ):-–भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशाने अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा भाजपाची कार्यकारणी जाहिर केली असुन यामध्ये पिंपळी गवळीच्या आदर्श सरपंच अश्विनी दत्ताञय थोरात यांची अहमदनगर दक्षिण महिला भाजपा जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
अश्विनी थोरात या मागील तीन वर्षापासुन अहमदनगर दक्षिण भागात पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पाटील व खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.महिला समक्षीकरण,बचत चळवळ,स्ञी जन्माचे स्वागत,महिला आरोग्य व सुरक्षा आदी उपक्रम त्यांनी जिल्हात राबवले आहेत.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध लोककल्याणकारी योजना जनमाणसात राबवण्यासाठी मोठे कार्य पक्षाच्या वतीने केले आहे.पारनेर तालुक्यासह जिल्हात महिला भाजपाचे संघटन अतिशय मजबुत केले आहे.तसेच त्या पिंपरी गवळीच्या आदर्श महिला सरपंच म्हणुण उल्लेखनीय काम केले आहे.तसेच त्या सरपंच परिषदेच्या राज्यउपाध्यक्ष म्हणुण काम करत आहेत.अश्विनीताई थोरात यांच्या पक्षाप्रती असलेल्या प्रामाणिक निष्ठा व कार्याची दखल घेऊन अहमदनगर भाजपा दक्षिण महिला जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली गेली आहे.
यानिवडी निमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,महसुलमंञी राधाकृष्ण विखे पाटील,खा.सुजय विखे पाटील,आ.बबनराव पाचपुते,आ.राम शिंदे,आ.मोनिका राजळे,माजी आ.शिवाजीराव कर्डिले,जिल्हाध्यक्ष दिलिप भालसिंग आदीनी या निवडीची स्वागत करून अश्विनी थोरात यांचे अभिनंदन केले आहे.



