spot_img
spot_img

कै. सौ. सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची इस्त्रोसाठी निवड

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- मार्च- २०२३   मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.सी. व्ही रामन या परीक्षेत कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय नेवासा या विद्यालयातील एकूण – २० विद्यार्थीनी प्रविष्ठ झाल्या. या परीक्षेत इ. ९ वी मधील कु. मापारी आर्या शाम ही तालुक्यात चौथी आली तर, इ.५ वी मधील कु. पोटे सिध्दिका विष्णू ही तालुक्यात दुसरी आली. या विद्यार्थीनींचा सत्कार विद्यालयात, नेवासा तालुका गट शिक्षणाधिकारी श्री. शिवाजीराव कराड यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थीनींची इस्रोच्या श्रीहरिकोटा सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमप्रसंगी गट शिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड यांनी विद्यार्थीनींना स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंचायत समिती नेवासा शिक्षण विभाग सहाय्यक शमी शेख विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती. पानसरे मॅडम, पर्यवेक्षक श्री. चौधरी सर विज्ञान शिक्षक श्री. दरंदले सर, , खोसे सर, कोरडे सर, श्रीमती. हापसे मॅडम उपस्थित होते. श्री . व्यवहारे सर यांनी सुत्रसंचालन केले. श्री. कोरडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!