श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- तेलंगणा सरकारने शेतकरी, युवक, महिला, अपंग यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवून तसेच कालेश्वरम सारखी जगातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचन व पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लावून अल्पावधीतच तेलंगणा राज्याचा विकास केला. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून विकास योजना राबवून राज्याचा विकास करु, असे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील माळवाडगाव भोकर व भामाठाण येथील कार्यकर्त्यांनी माजी आ.श्री.मुरकुटे यांचे उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. त्यावेळी श्री. मुरकुटे बोलत होते. यावेळी शहरातील नानासाहेब गांगड, माळवाडगाव येथील सेवानिवृत्त कृषि अधिकारी अशोकराव साळवे, डाक विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण औटी, अंकुशराव आसने, गोरख दळे, भाऊसाहेब आसने, रावसाहेब आसने, नवनाथ आसने आणि भोकर येथील सुर्यकांत साळुंके, संतोष भोगे, पप्पू थोरात, कांचनराव गायकवाड, प्रशांत दांगट, राजेंद्र आसने, बंडू साळुंके, सोमनाथ आसने, संजय होनमाने तसेच भामाठाण येथील अजय वाकचौरे व विजय बनसोडे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
युवक तालुकाध्यक्ष गणेश छल्लारे आपल्या प्रास्तविकात म्हणाले की, भारत राष्ट्र समिती पक्षाचे शेतकर्यांना सुजलाम सुफलाम करण्याचे ध्येय धोरण असून यापुढील काळात पक्षाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले. याप्रसंगी मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, भारत राष्ट्र समितीचे शहराध्यक्ष नाना पाटील, युवकचे तालुका उपाध्यक्ष दिपक काळे, रोहन डावखर, बबनराव आसने, शिवनाथ आव्हाड, बापुसाहेब दळे आदी उपस्थित होते. सचिव गणेश भाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



