लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-मुलगा -मुलगी भेद न करता बेटी बचाओ बेटी पढाओ! चा संदेश देत प्रवरा कन्या विद्यामंदीरच्या विद्यार्थ्यांनी लोणी बुद्रुक येथे पथनाट्य सादर करत आम्हा मुलींनाही समजून घ्या, आमच्या वरील अन्याय आणि आमची हिंसा कमी करा हा संदेश देत भावनिक साद घातली.
पंचायत समिती राहाता शिक्षण विभाग, राहाता तालुका बार असोसिएशन आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या विद्यार्थिनींनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ! हा संदेश देणारे पथनाट्य सादर करत स्त्री भ्रुणहत्या, मुलगा मुलगी लिंगभेद, मुलीचा छळ, हुंडाबंदी, स्त्री अत्याचार यांवर जनजागृती करत आम्ही मुली ही कमी नाहीत, नारी आता अबला नाही, मुलींचे शिक्षण आदी विषयांवर जागृती केली.
यावेळी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. बायजाबाई विलायते, राहाता बार असोसिएशचे अॅड नितीन विखे, अॅड. आर. व्ही. नाईक, अॅड नितीन पंडीत विखे, ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव विखे, केंद्र प्रमुख नंदकिशोर भांड,दिनेश काळे, दिलीपराव विखे, प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या प्राचार्या भारती कुमकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिमा बढे, सांस्कृतिक विभाग प्रमुख पल्लवी पवार, सोनाली मेंढे, विद्या घोरपडे, कला शिक्षक जितेंद्र बोरा आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पथनाट्य सादर करतांना मुलींनी केलेले भावनिक आवाहान जनजागृती करणारे ठरले. प्रवरेच्या माध्यमातून आम्ही मुली कोठेचं कमी नाही हाच संदेश दिला. समाज जागृतीच्या या उपक्रमास नागरीकांनी ही मोठा प्रतिसाद देत पथनाट्याचे कौतुक केले.




