spot_img
spot_img

कोल्हार येथे अवैध गोमांस विक्री करणाऱ्यास पकडले

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा  ) :- कोल्हार येथे काही दिवसांपूर्वीच अवैधपणे गोमांस विक्रीची घटना समोर आली होती. काल पुन्हा कोल्हार- बेलापूर चौकात विक्रीसाठी अवैधपणे आणलेले गोमांस काही सतर्क युवकांमुळे लोणी पोलिसांनी पकडले. यामध्ये सुमारे ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

कोल्हारमध्ये यापूर्वी अवैध गोमांस विक्री होत असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वीच नगर-मनमाड रस्त्यालगत कोल्हार येथे गोमांस विक्री करणाऱ्या ममदापुर येथील एकास लोणी पोलीस व येथील काही सुजाण नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडले होते. काल पुन्हा याची पुनरावृत्ती झाली. अत्यंत रहदारी असलेल्या कोल्हार- बेलापूर चौकात अवैध गोमांस विक्री होत असल्याचे माहिती मिळताच येथील काही सजग नागरिकांनी लोणी पोलिसांना याची खबर दिली.

एम एच १७ सिजी ३५९१ या स्कुटीवरून गोमांस विक्रीसाठी आलेला आरोपी एजाज शौकत पठाण रा. कोल्हार यास रंगेहाथ पकडण्यात आले. गोणीत भरलेले गोमांस व स्कुटी वाहन असे ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लोणी पोलिसांनी हस्तगत केला. महाराष्ट्र पशु संरक्षण नियम १९७६ अन्व्हये कलम ५ सी, ९ ए, ९ बी, ११ अन्वये लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि युवराज आठरे यांचे मार्गदर्शनाखाली पो हे कॉ दिनकर चव्हाण करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!